⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

वाघ वाचवा संदेश देत वन्यजीवचे व्याघ्रदूत गावागावात जनजागृतीची सुरवात!

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ । जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मानव वन्यजीव संघर्ष टाळणे, आणि व्याघ्र संवर्धनासाठी वन्यजीव संरक्षण संस्था , वनविभाग जळगांव, यावल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव यांच्या सैयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्यासाठी आज 28 जुलै रोजी व्याघ्र संवर्धन जनजागृती मोटारसायकल रॅली जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयातून काढण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व उदघाटक महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विशाल भोळे, वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, टायगर कॉन्झर्वेशन अँड रिसर्च सेंटर मुंबई चे प्रसाद हिरे, स्टँडिंग फॉर टायगर फौंडेशन चे रवींद्र मोहोड, राजेंद्र नंनवरे, अभय उजागरे, चंद्रशेखर नेवे हे होते.

महापौर जयश्रीताई महाजन, यांनी वाघांचे आणि जंगलाचे संवर्धन करण्यासाठी लोकसहभाची आवश्यकता असून या साठी या प्रकारच्या जनजागृती रॅली आणि कर्यक्रमांची नितांत आवश्यकता आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेने घेतलेल्या पुढाकाराने नक्कीच फायदा होईल असे प्रतिपादन केले, अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जळगांव जिल्ह्यातील वने आणि वन्यजीवांचे महत्व विशद केले, लोकसहभागतून जनजागृती आणि जनजागृती द्वारे लोकसहभाग वाढवून वन्यजीवांचे अधिक चांगल्या प्रकारे संवर्धन करता येईल असे ते म्हणाले, मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभाग आणि वन्यजीव संरक्षण संस्था करत असलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे असून असे कार्यक्रम सतत राबवले गेले पाहिजे असेही ते म्हणाले.

या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि मान्यवरांच्या हस्ते, लघुउद्योग भारती,जळगांव कींनगाव ग्रामस्थ तरुण, रवींद्र सोनवणे, आणि मानवी वाघ अभय तायडे यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवत रॅली ला मार्गस्थ केले. कार्यक्रम सैयोजक उपवन संरक्षक विवेक होशिंग, रवींद्र फालक यांनी मार्गदर्शन केले. बाळकृष्ण देवरे यांनी प्रास्ताविक करत संस्थेची भूमिका स्पष्ट केली. सूत्र संचालन वनक्षेत्रपाल दत्तात्रय लोंढे यांनी केले आभार प्रदर्शन योगेश गालफाडे यांनी केले.

वाघांची वेशभूषा आणि मुखवटे घातलेले व्याघ्र दूत, वाघ असलेले सजवलेले रेस्क्यू वाहन, विनोद ढगे यांचे करूया वाघाचे रक्षण पथनाट्य, आणि मानव वन्यजीव संघर्ष टाळण्या संदर्भातील माहिती पत्रके हे या वर्षीच्या जनजागृती रॅलीचे खास आकर्षण ठरले , गेल्या 2 वर्षा पासून कोरोना मुळे रॅलीचे आयोजन व्यापक स्तरावर करण्यात आले नव्हते यंदा मात्र जल्लोषात नियोजन सुरू होते. वाघ वाचवा, जंगल वाचवा च्या घोषणा देत टॉवर चौकात पथनाट्य घेण्यात आले.

जळगांव, धुळे, नंदुरबार, नासिक, ठाणे, वाशीम, शिर्डी , मेळघाट, दिल्ली येथून सुमारे 150 व्याघ्र दूत या महा रॅलीत सहभागी झाले आहेत 28 जुलै रोजी जळगांव, भुसावळ, वरणगाव, मुक्ताई नगर, या ठिकाणी जनजागृती करण्यात आली. 29 जुलै जागतिक व्याघ्र दिनी डोलारखेडा, चारठाणा, वायला दुई, सुकळी, राजुरा, आणि परिसरातील गावात पथनाट्य सादर करत मानव वन्यजीव संघर्ष बचाव , आणि वाघ वाचवा या विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे.

रॅली च्या यशस्वीते साठी सैयोजक विवेक होशिंग, मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, सतीश कांबळे, जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, निलेश ढाके, राहुल सोनवणे, ऋषी राजपूत, वासुदेव वाढे, विजय रायपुरे, अलेक्स प्रेसडी, अमन गुजर, रवींद्र सपकाळे, रवींद्र सोनवणे, अजीम काझी, प्रदीप शेळके, विनोद सोनवणे, भूषण चौधरी, ललित शिरसाठे, बबलू शिंदे, हेमराज सोनवणे, विनोद ढगे, दुर्गेश आंबेकर, परिश्रम घेत आहेत 29 रोजी देखील जास्तीत जास्त नागरिकांनी या महारॅलीत सहभागी होऊन व्याघ्रदूतांचे स्वागत करावे असे निमंत्रक योगेश गालफाडे यांनी आवाहन केले आहे.