⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

भारतीय शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचा जीवन प्रवास वाचाल तर व्हाल थक्क !

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । भारताच्या शेअर मार्केटमधील वॉरेन बफे, प्रसिद्ध उद्योगपती राकेश झुनझुनवाला यांचे शनिवारी निधन झाले. शेअर मार्केट जगतात ते बिग बुल नावाने प्रसिद्ध होते. त्यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राकेश झुनझुनवाला गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना काही आठवड्यांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. राकेश झुनझुनवाला यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांनी ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांचं निधन झाल्याची माहिती दिली. झुनझुनवाला यांना किडनीचा आजार असल्याची माहिती समोर आली आहे.

झुनझुनवाला हे नाव ऐकलं की सर्वसामान्य नागरिकांसमोर उभा राहतो तो पैसा किंबहुना त्यांची संपत्ती. मात्र झुंझुनवाला यांनाही संपत्ती मिळवली ती म्हणजे त्यांनी केलेल्या तपश्चर्येमुळे. 1985 साली फक्त पाच हजार रुपये घेऊन त्यांनी आपल्या गुंतवणुकीला सुरुवात केली होती. त्यानंतर ते तब्बल 11000 कोटींचे मालक झाले. बिगबुल म्हणजेच शेअर मार्केटचा राजा म्हणून ते ओळखले जाऊ लागले. त्यांचा पहिला मोठा नफा 1986 मध्ये पाच लाख रुपयांचा होता. त्यानंतर त्यांनी १९८६ ते १९८९ या काळामध्ये तब्बल 25 लाख रुपयांचा नफा मिळवला. 1986 मध्ये टाटा टी चे शेअर त्यांनी 43 रुपयांना विकत घेतले होते. तर ते शेअर तीन महिन्यांमध्ये 143 रुपये झाले. ज्यामुळे त्यांचा नफा तीन पट झाला. 2021 मध्ये त्यांनी सर्वात मोठी गुंतवणूक टायटन कंपनीत केली होती. याची किंमत होती ७२९४ cr.

हे सगळं जरी मान्य असलं तरी पण झुनझुनवाला यांनी केवळ एखाद्या शेअर मार्केटमध्ये सगळे पैसे गुंतवले असे नाही. तर झुंझुनवाला आहे लिमिटेड आणि हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट या कंपनीचे अध्यक्ष होते. याचबरोबरयाशिवाय प्राइम फोकस ली., जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस, बिलकेअर लि., प्राज इंडस्ट्रीज लि., प्रोव्होग इंडिया लि., कॉन्कॉर्ड बायोटेक लि., इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज (आय) लि., मिड डे मल्टीमीडिया लि., नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी लि. ., व्हाइसरॉय हॉटेल्स लि. आणि टॉप्स सिक्युरिटी लि. यांचा संचालक मंडळात समावेश करण्यात आला.