बोदवडला तत्काळ तहसीलदारांची नेमणूक करा : आमदार चंद्रकांत पाटील

ऑगस्ट 25, 2022 7:31 PM

chandrakant patil vikhepatil

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ । बोदवड शहरात तहसीलदारांची तत्काळ नेमणूक करावी, अशी मागणी लेखी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. प्रसंगी सोबत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण उपस्थित होते.

आमदार पाटील यांनी गुरुवारी महसूल मंत्र्यांना दिलेल्या पत्राचा आशय असा की, मतदारसंघात बोदवड हा 52 गावांचा तालुका असून गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून प्रभारी तहसीलदार कार्यभार सांभाळत आहे त्यामुळे शेतकर्‍यांना शेतीच्या कामांसाठी तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले प्रमाणपत्र मिळण्यासाठी वेळ व पैसा वाया जात आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर आवश्यक ती प्रमाणपत्रे मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावरही परीणाम होत आहे. सद्यःस्थितीत असलेल्या तहसीदारांकडे दोन तालुक्यांचा कार्यभार असल्याने वेळेअभावी दोन्ही तालुक्यांना न्याय देता येत नाही. बोदवडला कायमस्वरूपी तहसीलदारांची तत्काळ नेमणूक करून गैरसोय दूर करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now