⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

युवारंग 2023 : खान्देशातील १४०० विद्यार्थी उधळणार कलागुणांचे रंग

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ ऑक्टोबर २०२३ | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आयोजित युवारंग 2023 खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय कान्ह कला नगरीत दिनांक 7 ते 11 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार या तिघं जिल्ह्यामधून सुमारे १४०० विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होणार असून पहिल्या दिवशी दि.७ रोजी सांस्कृतिक पथसंचलन दुपारी चार वाजता मूळजी जेठा महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरू होईल.

विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक पथसंचलनात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, शिवराज्याभिषेक सोहळा अशा विविध विषयांना विद्यार्थी पेहराव करून या पथसंचलनात सहभागी होणार आहेत तर उद्घाटन सोहळा दुसऱ्या दिवशी दि.८ रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे या कार्यक्रमाला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक विजय माहेश्वरी तर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आयोजन समितीचे अध्यक्ष तथा केसीई संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे आदी मान्यवरांची उपस्थिती राहील.

या पाच दिवस चालणाऱ्या युवा रंग युवक महोत्सवात मूळजी जेठा महाविद्यालयाच्या प्रांगणात पाच रंगमंच तयार करण्यात आले आहेत.

1.कवयित्री बहिणाबाई चौधरी रंगमंच क्रमांक-1 (एकलव्य क्रीडांगण) मुख्य रंगमंच उद्घाटन व समारोप
2.पद्मश्री ना.धो. महानोर रंगमंच क्रमांक-2 (ओल्ड कॉन्फरन्स हॉल)
3.पूज्य साने गुरुजी रंगमंच क्रमांक -3 (हॉल क्रमांक 29 मुख्य इमारत, पहिला मजला)
4.भारतरत्न लता मंगेशकर रंगमंच क्रमांक-4 (ग्रंथालय जवळील वाचनालय)
5.कलामहर्षी केकी मूस रंगमंच क्रमांक-5 (ह्युमॅनिटीज बिल्डिंग)

या युवारंग युवक महोत्सवात संगीत- भारतीय शास्त्रीय गायन, भारतीय शास्त्रीय वाद्य, संगीत -नाट्यसंगीत, भारतीय सुगम संगीत, भारतीय समूह गाण, भारतीय लोकसंगीत, वाद्य – पाश्चिमात्य गायन, पाश्चिमात्य वाद्य, संगीत पाश्चिमात्य समूह गान, नृत्य- भारतीय शास्त्रीय नृत्य, भारतीय लोक समूह नृत्य, वाङ्मयीन कला प्रकारात वकृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा रंगमंच या कला प्रकारात नक्कल, मुकाभिनय, प्रहसन आणि ललित कला प्रकारात स्थळचित्र, चिकटकला, पोस्टर मेकिंग, माती कला, व्यंगचित्र, रांगोळी, स्थळ छायाचित्र, इन्स्टॉलेशन, मेहंदी या विषयांवर विद्यार्थी सादरीकरण करणार आहेत. विद्यार्थ्यांची निवासी राहण्याची व्यवस्था स्वामी विवेकानंद भवन येथे ६०० विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ७०० यांची निवासी व्यवस्था मुलींच्या वसतिगृहात केली आहे.

कार्यक्रमाचा समारोप आणि बक्षीस वितरण दि.११ रोजी होणार असून या करिता कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. एस.टी. इंगळे राहतील पारितोषिक वितरण सुप्रसिद्ध सिने कलाकार जय मल्हार फेम सुरभी हांडे याच्या हस्ते होईल. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आमदार शिरीष चौधरी आमदार सुरेश भोळे, कुलसचिव विनोद पाटील, ॲड. प्रवीणचंद्र जंगले, ज्ञानदेव पाटील, राजेंद्र नन्नवरे, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष भालचंद्र पाटील उपस्थित राहणार आहेत.