जळगावात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच, तरुणाची दुचाकी लांबविली

मे 19, 2022 6:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२२ । जळगाव शहरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. दिवसेंदिवस दुचाकी चोरी जाण्याच्या घटना समोर येत असून चोरट्यांना पोलिसांचा धाकच शिल्लक राहिलेला नसल्याचे दिसून येतेय.

crime 59

अशातच शहरातील गोलाणी मार्केट परिसरात हॉस्पिटलच्या कामासाठी आलेल्या तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबविली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारायण राजाराम पाटील (वय-४४) रा. रवंजा ता.जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १४ मे रोजी सकाळी ११ वाजता शहरातील गोलाणी मार्केटजवळील रूद्राक्ष मोबाईल रिपेअरींग दुकानासमोर दुचाकी (एमएच १९ एवाय २६०४) ने आले. दुचाकी पार्क करून ते डॉ. नरेंद्र जैन यांच्या दवाखान्यात कामानिमित्त गेले.

त्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी जागेवर दिसून आली नाही. त्यांनी दुचाकीचा परिसरात शोधाशोध केली परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर गुरूवार १९ मे रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस कर्मचारी करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now