जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मार्च 19, 2021 1:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२१ । जळगाव गेंदालाल मिल मध्ये १८ वर्षीय तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे घटना काल गुरुवारी उघडकीस आली आहे. विजय अशोक पाटील (वय-१८) असे मयत तरूणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime

विजय हा अविवाहित होता. हातमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होता. गुरुवारी 18 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसताना 6 वाजता आई घरात काम करत असतांना वरच्या मजल्यावर जाऊन येतो असे सांगून तो वरच्या मजल्यावर गेला, मात्र बराच वेळ झाल्यानंतर तो खाली न आल्याने आई पुष्पा त्याला बोलवायला गेली असता आतून दरवाजा बंद होता. खिडकीतून डोकावून पाहिले तर विजय याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे आईने जागेवरच हंबरडा फोडला. नातेवाईकांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पश्चात आई, भाऊ संतोष व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories