तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

एप्रिल 25, 2022 1:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । तालुक्यातील कुसुंबा येथील २५ वर्षीय तरुणाने रविवारी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. रविवारी सकाळी ११ वाजता ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. धनंजय चंद्रजीत बाविस्कर (वय २५, मुळ रा. धनवाडी, ता. चोपडा) असे मृताचे नाव आहे.
धनंजय बाविस्कर हा गेल्या दोन वर्षांपासून पत्नी उज्ज्वलासह कुसुंब्यात राहत होता. गावातच धनंजयची बहिण शुभांगी आणि मेहुणे दीपक पाटील राहतात. धनंजय एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट कंपनीत नोकरीला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी धनंजयची पत्नी उज्ज्वला माहेरी गेली होती. २३ एप्रिल रोजी रात्री १० वाजता बहिण शुभांगीकडे जेवण केले.

gadfas mrutu

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now