भानखेड्यात दोघांकडून तरुणाला मारहाण; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२२ । घरावरील पत्रे का काढत आहे, असे सांगत दाेन जणांनी भुसावळ तालुक्यातील भानखेड्यातील भिलवस्तीत युवकाला मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. २५) सायंकाळी ५.३० वाजता घडली. याप्रकरणी दाेन जणांविरूध्द तालुका पाेलिसांत गुन्हा दाखल झाला.

भानखेडा येथे तुकाराम बुधाे सपकाळे हे त्यांच्या भिल्ल वस्तीतील जुन्या घराची पत्रे काढण्यास गेले होते. त्याचा राग आल्याने मधुकर सुकदेव सपकाळे व त्याचा मुलगा महेद्र सपकाळे यांनी तुकाराम सपकाळे यांना घर व घरावरील पत्रे अामची अाहेत. तु घेण्यासाठी का अालास असे बाेलून शिवीगाळ करून मारहाण केली. अंगणातील लाकडी काठी हातात घेत सपकाळे यांच्या छातीवर, हातावर, पायावर मारहाण केली. पुन्हा अाल्यास तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. सपकाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.