⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

यावल तालुका पोटनिवड प्रारूप मतदार यादी जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीतील १९ सदस्यांच्या जागेकरिता पोटनिवडणुकी संदर्भातील हालचाल सुरू झाली आहे. नुकतेच या सर्व जागेसाठी ची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून त्यावर हरकती मागवल्या जात आहे. तर अंतिम मतदार यादी ५ मे रोजी प्रसिद्ध करून पुढील कार्यवाही होणार आहे.

तालुक्यात विविध कारणांनी १४ ग्रामपंचायतीमधील १९ जागा रिक्त आहेत. या सर्व १९ जागेकरिताची प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या प्रारूप मतदार यादी वर दि. ४ मे पर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहे. तर प्राप्त हरकतींचा निपटारा करून दि. ५ मे रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तेव्हा नागरीकांना या प्रारूप मतदार यादीत काही हरत असल्यास त्या संर्दभात तक्रार करण्याची संधी देण्यात आली आहे.

या ग्रामपंचायतीची यादी प्रसिध्द
गिरडगाव प्र. क्र. एक प्रभाग जागा एसटी महिला, कोळन्हावी प्र.क्र. १ व ३ दोन्ही जागा एसटी महिला, भालोद प्र.क्र.३ एसटी, राजोरा प्र.क्र.२ सर्वसाधारण, सावखेडासिम प्र.क्र.३ एसटी महिला, हिंगोणा प्र.क्र.४ एसटी महिला, आडगाव प्र.क्र.१ एसटी महिला, चिंचोली प्र.क्र.२ नामाप्र, पिळोदा बुद्रुक प्र.क्र. ३ दोन जाता एसटी व एसटी महिला,शिरागड प्र.क्र. ३ तीन जागा एसटी व एसटी महिला, बोरखेडा बुद्रुक प्र.क्र.३ दोन जागा नामाप्र व एसटी महिला, बोरावल खुर्द प्र.क्र.३ एसटी, डांभुर्णी प्र.क्र.५ एसटी महिला व म्हैसवाडी प्र.क्र.३ एसटी.