⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

मामाचे पत्र हरवल तुम्हाला सापडलं का? आज जागतिक टपाल दिवस

जळगाव लाइव न्यूज । गौरी बारी । मामाचे पत्र हरवल तुम्हाला सापडलं का ? हि एक आठवण बनून राहिलेलं गाणं आपण लहापणी खेळायचो आणि ऐकायचो पत्र देखील लहापणीच आपल्याला पाहायला मिळालेत आता इंटरनेटच्या च्या विश्वात पत्र खरंच हरवलेलं दिसत आहे आणि त्याच मुळे आता पोस्टमन काका देखील दिसत नाहीत. या बद्दल आज बोलायचं कारण म्हणजे आज आहे ९ ऑक्टोबर या दिवसाला जागतिक टपाल दिवस म्हणून साजरा केला जात असतो.

कशी झाली पोस्टल युनियन ची सुरवात ?

युनिव्हर्सल पोस्टल युनियनची ९ ऑक्टोबर १८७४साली स्थापना झाली होती. १९६९पासून हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. पोस्टाच्या कामाची माहिती व्हावी, जनजागृती होवून पोस्टाचे महत्व वाढीस लागावे म्हणून हा दिन साजरा करण्यामागील हेतू आहे. अनेक देशात यानिमित्ताने पोस्टल विक देखील पाळला जातो.

मोबाईल, व्हॉट्‌सऍप, ईमेल आदींचा वापर सर्रास होत आहे. त्यामुळे अनेक लोकांना अनेक वर्षे घरपोच सेवा देणाऱ्या आणि केवळ अवघ्या 50 पैशांत देशाच्या कानाकोपऱ्यात जाणारे पोस्टकार्ड सध्या दुर्मिळ झाले आहे. तसेच लोकांना पत्र देऊन त्यांच्या सुख-दुःखात समरस होणारा व आपुलकीच्या सेवेतून घरोघरी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारा व अतूट नाती जपणारा पोस्टमनही काळाच्या ओघात हरवत चालला आहे हि खंत खरी सतावत आहे. बदलत्या काळात दळणवळणाच्या मोबाईल व व्हॉट्‌सऍप, इलेक्‍ट्रॉनिक मेल साधनांचा वापर वाढू लागला आहे. नव्या पिढीवर त्यांचा प्रभाव व आकर्षण वाढले आहेत.