⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

मा.ध.पालेशा महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिन साजरा

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । घुळे येथील मा. ध. पालेशा वाणिज्य महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिना निमित्त जागतिक पातळीवरील अनेक निरनिराळ्या लेखकांचे पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले. यामध्ये प्राचार्य डॉ. पी. पी. छाजेड यांनी विद्यार्थ्यंना जागतिक पुस्तक दिनाचे महत्त्व सांगून जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दीष्ट असल्याचे सांगितले.

विद्यार्थीनी वाचनाची सवय वाढवणे आवश्यक आहे. पुस्तकाचे स्थान आपल्या जीवनात, समाज विकासात, अनुभव समृद्धीमध्ये अढळ आहे. यानंतर महाविद्यालयाचे वरिष्ठ प्रा. बी. बी. काळे यांनी विद्यार्थ्यानी महाविद्यालयात अनेक पुस्तके आहेत त्यांचा लाभ घ्यावा व विद्यार्थ्यानी कोणते पुस्तक वाचावे त्यामधून काय ज्ञान घ्यावे या संबंधी माहिती संगितली.  कुंभार जसे मातीच्या गोळ्याला आकार देऊन जशी मूर्ती तयार होते, तसेच पुस्तके आपल्या आयुष्याला आकार देत असतात. विचार करायचे अंतर्मन, जग पाहण्याची वेगळी दृष्टी पुस्तके प्रदान करतात. प्रा. एस. डी. पाटील यांनी संगितले की, आज जागतिक लेखक  विल्यम शेक्सपियर, मिगुएल सर्व्हंटिस आणि इंका गार्सिलोसो यांच्यासह जगातील ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, युनेस्कोने २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केल्याचेही यावेळी सांगाळण्यात आले.

ग्रंथपाल डॉ. चंद्रशेखर वाणी यांनी पुस्तकाचे दिनाचे महत्त्व सांगताना सांगितले की, लिहणारे लिहीत जावे, वाचणा-याने वाचत जावे, कधीतरी वाचणा-याने लिहणा-याचे शब्द घ्यावे इतकं सुंदर आहे हे वाचणं वाचनाने आपली भाषा, विचार समृद्ध होतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यानी निरनिराळे अनेक ग्रंथांचे वाचन  करावे. तसेच त्यांनी कॉपीराइट दिनाचे देखील महत्त्व सांगितले. सदर कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्रा.बी.बी. बारसे, प्रा. डॉ. हेमंत जोशी, प्रा.एच.पी. बडगुजर, कार्यालय अधीक्षक संजय झेंडे, ऋषिकेश बापट तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.