मजूर महिलांवर मधमाशांनी चढवला हल्ला; पाच महिलांसह एक पुरुष जखमी

एप्रिल 3, 2022 2:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२२ । भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथील शेतकरी दयाराम कौतिक पाटील यांच्या पिंपरी शिवारातील शेतामध्ये काम करत असताना मजूर महिलांवर मधमाशांनी हल्ला चढवला. त्यात पाच महिलांसह एक पुरुष मजूर जखमी झाला. प्राथमिक उपचार केल्यानंतर या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

madha mashi jpg webp

हे जखमी

संगीता हेमराज काटे, पूजा गणेश कंकरे, अर्चना किरण कंकरे, निकिता संजय कंकरे, विमलबाई शंकर शिरसाळे व दिगंबर दयाराम पाटील हे मजूर जखमी झाले. दरम्याम, मधमाशांनी अचानक हल्ला चढवल्याचे पाहून शेतमजूर महिला आरडाओरडा करत धावत सुटल्या. हा प्रकार लक्षात येताच त्यांना तातडीने गावातील खासगी डॉक्टरांकडे नेऊन प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान, सध्या शेती शिवारात अनेक ठिकाणी आगेमोहळाचे पोळ बसले आहे. काही पक्षी या पोळांना चोच मारतात. तसेच तापमानामुळे देखील मधमाशा बिथरून हल्ला चढवत आहेत, अशी माहिती जाणकार शेतकऱ्यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now