---Advertisement---
गुन्हे रावेर

हनी ट्रॅपमध्ये अडकवून ११ लाखांची खंडणी मागणारी महिला ताब्यात ; रावेरातील धक्कादायक घटना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२५ । जळगावच्या रावेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात हनी ट्रॅपमध्ये अडकवून एका धनाढ्य व्यक्तीला ११ लाखांची खंडणी मागणाऱ्या महिलेला एक लाख रूपये स्वीकारताना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतलं. याप्रकरणी महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

hany trap

नेमकी घटना काय?
सदरची घटना २०१८ मध्ये घडली असून एकजण कारने ट्वेरहून जळगावला येत असताना चोपडा तालुक्यातील एका ४३ वर्षीय महिलेने लिफ्ट मागितली. गाडी खाली असल्याने इसमाने महिलेला लिफ्ट दिली. सोबत प्रवास केल्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली. दरम्यान एकदा सदर इसमास महिलेने जेवणास बोलवले असता तिने कोल्ड्रीक्समध्ये गुंगीचे औषध टाकून त्यास बेशुद्ध करून त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याचा व्हिडीओ देखील तिने केला.

---Advertisement---

घडल्या प्रकरणानंतर सदरचा इसम अनभिन्न होता. याच दरम्यान सदरचा व्हीडीओ महिलेने इसमाच्या घरी व सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार खंडणी मागू लागली. बदनामीला घाबरून इसमाने २३ डिसेंबर २०२३ पासून महिला व तिच्या मुलाच्या खात्यावर फोन पेद्वारे ११ लाख रुपये टाकले. तरी देखील या महिलेची पैशांची मागणी सुरूच ठेवली. यामुळे त्रस्त झालेल्या व्यक्तीने रावेर पोलिसात याबाबत तक्रार दिली.

एक लाख रुपये स्वीकारताना घेतले ताब्यात
प्राप्त तक्रारीवरून १९ मार्चला रावेरचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी महिलेला पकडण्यासाठी पथक पाठविले. तर रावेर- बऱ्हाणपूर मार्गावरील एका दुकानामागील बाजूस इसमास महिलेने बोलावले होते. याच वेळी पथकाने एक लाख रुपये स्वीकारताना महिलेस ताब्यात घेतले. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव तपास करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment