जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर शिवारात वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला नुकतेच वन विभागाने पकडले होते. त्यांच्याकडून वन्यप्राण्यांचे अवशेष, मांस, जिवंत पक्षी वन्यप्राण्यांना पकडण्याचे साहित्य जाळे व पिंजरे आदी जप्त करण्यात आले होते. या शिकाऱ्यांची चौकशी केली असता आणखी चार शिकारी हाती लागले आहेत.

या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली असून आणखी काही फरार शिकाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. अशी माहिती उपवनसंरक्षक प्रवीण ए, यांनी दिली. दरम्यान या शिकाऱ्यांनी वाघ तसेच बिबट्याची देखील शिकार केल्याची कबुली दिल्याची चर्चा होती. या गुन्ह्यासंबंधी चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.
वन परिक्षेत्र चाळीसगाव अंतर्गत जुणपानी नियतक्षेत्रातील मौजे शिवापूर मालकी गट नं. १०५ तसेच मौजे ३२ क्र. तांडा येथून वन्यप्राण्यांचे अवशेष, मांस, जिवंत पक्षी, क्यप्राण्यांना पकडण्याचे साहित्य जाळे व पिंजरे असल्याची माहिती वन विभागाला १ रोजी मिळाली होती. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी जावून पाच जणांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्याचे सीडीआर सायबर सेल कडून मागवण्यात आले आहेत. अटक केलेल्या पाचही आरोपींची कसून चौकशी केली असता अजून काही आरोपी फरार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्यानंतर २ रोजी तालुक्यातील आडगाव येथे आरोपींचा शोध घेतला असता आणखी चार आरोपी हाती लागले.
वन्यजीवांच्या अवशेषाचे नमुने प्रयोगशाळेत
या अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता अजून काही आरोपी हॅकलवाडी सडगाव ता. जि. धुळे येथे पळून गेल्याची माहिती मिळाली. ३ रोजी मौजे हॅकळवाडी सडगाव येथे पकडलेल्या तसेच फरार आरोपांच्या घरांची या घरांची झडती घेतली असता तेथे चिंकारा कातडी, चिंकारा शिंगे, शिंगे, ससा ससा कातडी, रानडुक्कर सह विविध प्राण्यांचे अवशेष जप्त केले.