⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जळगावात पहाटेचा गारठा कायम, दुपारी उन्हाची तीव्रता वाढली

जळगाव | जिल्ह्यात किमान तापमान १३ ते १५ अंशांदरम्यान स्थिर आहे. किमान तापमान खाली आल्याने पहाटे गारठा कायम आहे. कमाल तापमान ३६ अंशांवर असल्याने दुपारी उन्हाची तीव्रता वाढली आहे. मध्य भारतात निर्माण झालेल्या चक्रावातामुळे तापमानात चढ-उतार हाेत आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान वाढत असून, किमान तापमानात तब्बल पाच ते आठ अंश चढ-उतार आहे.

जळगाव जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ हाेत असून उन्हाचा चटका बसत आहे. शनिवारनंतर रविवारीदेखील किमान तापमानात माेठे चढ-उतार झाले. जिल्ह्यातील यापूर्वी रविवारी कमाल तापमान ३६ अंशांवर हाेते. तर काल तापमान स्थिर होते. पुढील आठवड्यात तापमान चाळिशी पार जाण्याची शक्यता तर पारा ३६ अंशांवर आहे.

हे देखील वाचा :