जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२२ । सावदा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम दि.१७ जानेवारीपासून हाती घेण्यात येणार आहे. दुरुस्ती सुरु असल्याने पाणीपुरवठा ५ ते ६ दिवस बंद ठेवावा लागणार असल्याची माहिती मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली आहे.

सावदा शहरास पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन सावदा रेल्वे स्टेशन जवळील पूला खाली लिकेज झालेली आहे. त्या पाईप लाईनच्या दुरुस्तीचे कामकाज १७ जानेवारी पासुनसुरू करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामानिमित्त शहराचा पाणी पुरवठा सुमारे ५ ते ६ बंद करावा लागणार आहे. तरी नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करुन ठेवावा व पाण्याचा वापर काटकसरीने करुन नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्यधिकारी किशोर चव्हाण यांनी नागरिकांना केले आहे.

हे देखील वाचा :
- Jalgaon : बस स्थानकांवर चोऱ्या करणारा सराईत अटकेत ! 3 गुन्हे उघड, लाखोंचे दागिने हस्तगत
- राज्य मंत्रिमंडळाचे ७ धडाकेबाज निर्णय ; शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा
- जळगावात कापूस खरेदीला सुरुवात ; पहिल्याच दिवशी मिळाला इतका भाव?
- घर बंद करून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला! ३.२२ लाखांचा मुद्देमाल लंपास
- मुक्ताईनगरात भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी









