जळगावकरांनो पाणी साठवून ठेवा ; सलग‎ दाेन दिवस पाणीपुरवठा बंद‎ राहणार..

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२३ । जळगाव शहरातील (Jalgaon City) नागरिकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे जलशुद्धीकरण‎ केंद्रापासून शहरात येणाऱ्या जुन्या‎ जलवाहिनीला अमृत याेजनेंतर्गत‎ कस्तूरी हाॅटेलजवळ जाेडणीचे‎ काम केले जाणार आहे. यापार्श्वभूमीवर येत्या आठवड्यात जळगाव शहराचा पाणीपुरवठा सलग‎ दाेन दिवस बंद‎ राहणार आहे.

रामेश्वर काॅलनीत‎ सतत जलवाहिनी गळती हाेत‎ असल्याने त्या ठिकाणी १२००‎ मिलिमीटर व्यासाचे डीआय पाइप‎ टाकण्यात आले आहेत. नवीन व‎ जुनी जलवाहिनी जाेडणीचे काम‎ महामार्गालगत केले जाणार आहे.‎ यासाठी मक्तेदारामार्फत पाइप‎ जाेडणीची ठिकाणे निश्चित‎ करण्यात आले आहे. त्यामुळे‎ पुढच्या आठवड्यात साेमवारनंतर‎ काेणत्याही दिवशी जाेडणीचा‎ निर्णय घेतला जाणार आहे. तत्पूर्वी‎ तीन दिवस आधीच‎ महापालिकेकडून नागरिकांना‎ कळवले जाणार आहे.

पुढच्या‎ आठवड्यात सलग दाेन दिवस‎ पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने‎ पाण्याचा काटकसरीने वापर करणे‎ गरजेचे ठरणार आहे. दरम्यान,‎ अमृत पाणीपुरवठा याेजनेची‎ चाचणी घेण्याच्या उद्देशाने‎ महापालिकेच्या माध्यमातून हे‎ नियाेजन केले जाते आहे. एेनवेळी‎ नागरिकांची गैरसाेय हाेऊ नये‎ म्हणून आठवडाभर आधीच‎ नागरिकांना सतर्क केले जाते आहे.‎