⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी पारोळा, आडगावला काढली ‘ऐतिहासिक वारसा यात्रा’

नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी पारोळा, आडगावला काढली ‘ऐतिहासिक वारसा यात्रा’

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२२ । जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र जळगाव, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हाभरात आझादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. नेहरू युवा केंद्रातर्फे शनिवारी पारोळा आणि आडगाव येथे ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन करण्याविषयी जनजागृती करणाऱ्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पदयात्रेत सहभागी विद्यार्थ्यांनी मोहिमेची जनजागृती केली.

राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा यांच्या वतीने आझादी का अमृत महोत्सवांतर्गत राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय ते राणी लक्ष्मीबाई किल्ला पारोळा अशी पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत मोहिमेची जनजागृती करण्यात आली. आझादीच्या घोषणा देत संपूर्ण शहरात पदयात्रा काढण्यात आली व पदयात्रेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्राध्यापकांकडून किल्ल्याची व राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनाविषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक रोहन मोरे, प्रमुख पाहुणे क्रीडा अधिकारी एम.के. पाटील व राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील, नेहरू युवा केंद्र तालुका समन्वयक हिरालाल पाटील, संदेश पाटील व राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते. पदयात्रेत महाविद्यालयातील १२० विद्यार्थी आणि २० प्राध्यापक सहभागी झाले होते.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नेहरू युवा केंद्र जळगाव व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे ग्रामपंचायत, धनराज खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळा आडगाव यांच्या सहकार्याने हुतात्मा स्मारकाजवळ ऐतिहासिक पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी क्रीडा अधिकारी एम.के.पाटील यांच्यासह नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक मुकेश भालेराव आणि नेहा पवार आदींसह इतर पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते. पदयात्रेत आझादी का अमृत महोत्सव अभियानाविषयी जनजागृती करण्यात आली.