जळगाव जिल्हामुक्ताईनगर

सातोडला गावठी‎ दारूची भट्टी नष्ट‎, संशयिताला अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२२ । सातोड शिवारात सुरू असलेली गावठी दारूची हातभट्टी वर पोलिसांनी धडक कारवाई केली. यात दारू व अन्य‎ साहित्य असा १० हजार ७५०‎ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट‎ करण्यात आला. असून संशयिताला ताब्यात घेण्यात आले.

अंतुर्ली‎ मुक्ताईनगरचे पोलिस निरीक्षक‎ राहुल खताळ यांचे मार्गदर्शनाखाली‎ सातोड शिवारात सुरू असलेली‎ गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त‎ करण्यात आली. या कारवाईत ८‎ हजार रुपये किमतीच्या २०० लिटर‎ मापाचे चार प्लास्टिकचे ड्रम, त्यात‎ सुमारे ८०० लिटर गुळ व मोह‎ मिश्रित कच्चे रसायन, एक हजार‎ किमतीचे दोन ड्रम, त्यात १०० लिटर‎ गुळ मोह मिश्रित पक्के रसायन,‎ तयार गावठी लिटर दारू व अन्य‎ साहित्य असा १० हजार ७५०‎ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट‎ करण्यात आला. या कारवाईत‎ वसंता शिवराम बेलदार (रा.सातोड,‎ ता.मुक्ताईनगर) याला ताब्यात‎ घेण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक‎ सुदाम काकडे, हवालदार गणेश‎ मनुरे, रवींद्र मेढे, अंकुश बाविस्कर‎ यांच्या पथकाने ही कारवाई केली.‎

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button