⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

तुम्हाला माझेच डंपर दिसते का? म्हणत तलाठ्याला ढकलून मालकाने पळवले डंपर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । वाळूतस्करी करणाऱ्या एका डंपरचा तलाठ्याने खासगी वाहनाने पाठलाग केला. खाेटेनगरजवळच्या थांब्यावर त्यांनी हे डंपर अडविल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्याऐवजी मालकाने ‘तुम्हाला माझेच डम्पर दिसते का?’ म्हणत तलाठ्यांच्या अंगावर धावून जात डम्पर पळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आनंद इंगळे (रा. आव्हाणे) असे डम्पर मालकाचे नाव आहे. या प्रकरणी डम्पर मालक व चालक सागर याच्याविरुद्ध तालुका पोलिसांत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

मेहरुणचे तलाठी राजू कडू बान्हे यांना प्रांताधिकाऱ्यांनी रविवारी निमखेडी परिसरात अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गस्तीवर पाठविले होते. १०.४५ वाजता निमखेडी जकात नाक्याजवळ अवैध वाळू वाहतूक करताना डम्पर (क्र. एमएच १९ सीवाय ४४१४) आढळून आले. चालकाकडे परवाना मागितला असता, तो नव्हता. त्यामुळे तलाठ्यांनी डम्पर जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्याचे चालकाला सांगितले होते.