गुन्हेजळगाव जिल्हा

कुटुंबाला भेटून घरी परतत असताना काळाचा घाला, दुचाकीस्वार तरुण ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । भरधाव चारचाकी व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकी तरुण जागीच ठार झाल्याची घटना काल रविवारी तालुक्यातील विटेनर गावाजवळ नेरी रस्त्यावर घडली. तर चारचाकीचा चालक व आणखी काही जण जखमी झाले आहेत.

साहेबराव चिमा शिंदे (वय ३५ रा. चिंचखेडा ता.मोताळा जि.बुलडाणा) असे मृत झालेल्या दुचाकी स्वराचे नाव आहे. साहेबराव हा साक्री तालुक्यातील विजापूर नांदवन येथे मोठा भाऊ निताराम व आई-वडिलांना भेटण्यासाठी चार दिवसांपूर्वी दुचाकी (क्र.एमएच २८ डब्ल्यू ९४४०) गेला होता. रविवारी येथून परत घरी जात असताना विटेनर जवाजवळ नेरी रस्त्यावर समोरून येणारे मालवाहू वाहन (क्र. जीजे ०५बीटी ६४९८) व दुचाकीचा समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की दुचाकी दोन तुकडे होऊन रस्त्याच्या कडेला शेतात कलंडली.

दरम्यान, सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे साह्यक फोसदार अमदसिंग पाटील, विकास सातदिवे यांनी पंचनामा केला. शविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Related Articles

Back to top button