Jalgaon : ड्युटीवरून घरी येताच तरुणाने उचललं नको ते पाऊल

मार्च 26, 2024 3:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२४ । सध्या आत्महत्यांचे प्रमाण वाढताना दिसत असून अशातच जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे एका ४० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. समाधान बंडू कोळी (वय ४०) असे मृत इसमाचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

shirsoli jpg webp

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील समाधान बंडू कोळी गेल्या एक वर्षापासून पत्नी, दोन मुले यांच्यासह वास्तव्यास आहे. समाधान कोळी हे एका खाजगी कंपनीत काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. मागील काही दिवसांपासून ते नैराश्येत होते. दरम्यान आज २६ मार्चला सकाळी तो कंपनीत नाईट शिफ्ट करून कामावरून घरी आले. यानंतर दरवाजा बंद करून त्याने छताला गळफास लावून आत्महत्या केली.

पतीने आत्महत्या केल्याचे समजताच पत्नीने आक्रोश केला. यानंतर परिसरातील नागरिकांनी समाधान कोळी याना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now