बातम्यामहाराष्ट्रराजकारण

निवडणुकीसाठी राज ठाकरेंच्या मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध; वाचा महत्त्वाच्या घोषणा?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील पक्षांकडून जाहीरनामे जाहीर करण्यात आले. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निवडणुकीचा जाहीरनामा अद्याप जाहीर झाला नव्हता. यामुळे राज ठाकरेंच्या जाहीरनाम्यात नेमक्या काय घोषणा होता याकडे लक्ष लागले होते. अशातच आज शुक्रवारी मनसेनं आपला चारकलमी जाहीरनामा प्रसिद्ध केलाय.

‘आम्ही हे करु’ नावाने मनसेचा जाहीरनामा राज ठाकरेंच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. १९ वर्षांमध्ये काय केलं, त्याची माहितीही मनसेकडून यावेळी देण्यात आली. मनसेच्या जाहीरनाम्यात औद्योगिक धोरण, मराठीचा सन्मान, रोजगार, प्रशासनात मराठी, उच्च शिक्षणात मराठी, महिला सुरक्षेवर भर, त्याशिवाय गड किल्ल्यांचं संवर्धन, आरोग्य क्षेत्राच्यादृष्टीने महत्त्वाच्या घोषणा आणि आश्वासनांची लयलूट करण्यात आली आहे. मुलभूत गरजा आणि जीवनमान, हा पहिला मुद्दा असल्याचे यावेळी राज ठाकरे म्हणाले.

जाहीरनामा प्रसिद्ध करताना , अनेकांनी आम्ही काय करू हे दिलाय. २००६ साली महाराष्ट्राची ब्लू प्रिंट आणणार बोललो होतो. २०१४ साली ती प्रसिद्ध झाली. पण गेल्या दहा वर्षात कोणाला वेळ मिळाला नाही. २०१४ मधील तेच प्रश्न आजही आहेत, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

मनसेच्या जाहीरनाम्यात काय काय?
पुरेसं अन्न, पिण्याचं पाणी, निवारा, महिला कायदा सुव्यवस्था, आरोग्य क्रिडा, बालसंगोपन, प्राथमिक शिक्षण आणि रोजगार, उच्च शिक्षण, औद्योगिक धोरण, प्रशासन आणि मराठीचा सन्मान, दळणवळण, वीज, पाण्याचं नियोजन, महाराष्ट्रभर शहरांचे जाळे, घनकचरा व्यवस्थापन, मलविस्तारण, इंटरनेट उपलब्धता, पर्यावरण आणि जैवविविधता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button