जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील चैतन्य नगर भागात कार्यरत असलेल्या ’बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा’ १८ वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात गणेशपूजन, प्रार्थना आणि बहिणाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. ईनामदार, अरुण थोरात, तसेच उत्तर महाराष्ट्र प्रादेशिक क्षेत्राचे डॉ. मालेगावकर आणि अध्यक्ष पी. डी. चौधरी उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षा आशा रघुनाथ तळेले यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. विविध उपक्रम आणि सत्कार सोहळावर्धापन दिनाचे औचित्य साधून महादेव हॉस्पिटलच्या सहकार्याने ज्येष्ठ महिलांसाठी मोफत आरोग्य, मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा १३० महिलांनी लाभ घेतला.

कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाच्या नवनियुक्त व कार्यकारी मंडळातील सदस्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.’मुलगी वाचवा’ भारुडाला दादसंस्थेच्या वतीने सामाजिक संदेश देणारा ’मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ या विषयावर आधारित भारुडाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या भारुडाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. प्रास्ताविकात संस्थेच्या वतीने राबवल्या जाणार्या विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकोपयोगी कामांचा आढावा घेण्यात आला. सूत्रसंचालन श्रीमती पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शारदा खडके यांनी मानले. पसायदान आणि सामुदायिक घोषणेने कार्यक्रमाची सांगता झाली.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सचिव रजनी सुरेश महाजन, खजिनदार कौसल्या मनोहर पाटील, कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्य आणि चैतन्य नगर संघाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.








