⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

वीर सावरकर वाचून व समजून‎ घेण्याची आपली कुवत नाही‎ : चित्रा वाघ

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२२ । वीर सावरकर वाचून व समजून‎ घेण्याची आपली कुवत नाही.‎ त्यासाठी प्रत्यक्षात सावरकरांच्या‎ विचारांची आज देशाला खरी गरज‎ आहे. ज्या जागी कचरा पडला होता,‎ त्या जागी आज बोलका चौक दिसत‎ आहे. सावरकरांच्या विचारांचा‎ जाज्वल्य चौक आमदार मंगेश‎ चव्हाण यांनी बोलका करून‎ दाखवला आहे. चाळीसगाव हे वीर‎ सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन‎ झालेले असल्याने त्यांच्या‎ विचारांचा पगडा या शहराला‎ लाभल्याचे प्रतिपादन उपाध्यक्षा‎ चित्रा वाघ यांनी केली.‎

येथील वीर सावरकर चौक व‎ शहर पोलिस ठाणे, तहसील‎ कार्यालय परिसराच्या सुशोभीकरण‎ कामाचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी‎ त्या बाेलत हाेत्या. शनिवारी‎ सायंकाळी भाजपच्या प्रदेश‎ उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या हस्ते‎ वीर सावरकर चौक व शहर पोलिस ‎ ‎ ठाणे, तहसील कार्यालय परिसराच्या ‎सुशोभीकरण कामाचे लोकार्पण ‎ करण्यात आले. यावेळी आमदार‎ मंगेश चव्हाण, वक्ते प्रकाश पाठक, ‎तहसीलदार अमोल मोरे, पोलिस ‎निरीक्षक के. के. पाटील, गटविकास ‎अधिकारी नंदकुमार वाळेकर,‎ वसंतराव चंद्रात्रे, महिला‎ आयोगाच्या माजी अध्यक्षा देवयानी‎ ठाकरे आदी व्यासपीठावर उपस्थित‎ होते.

कार्यक्रमाला भाजपचे‎ ‎नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते‎ हजर होते. युवा मोर्चा प्रदेश‎ उपाध्यक्ष कपिल पाटील यांनी‎ आभार मानलेत.‎ प्रश्न साेडवण्यातच समाधान…‎ याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण‎ म्हणाले की, शहरातील दुर्लक्षित‎ असलेल्या वीर सावरकर चौकाचे‎ लोकार्पण होत असताना आनंद‎ आहे. शहरात अनेक समस्या‎ आहेत, त्या सोडवण्याचा परिपूर्ण‎ प्रयत्न करणार असून जो शब्द‎ शहरवासीयांना दिला, तो पाळणारच‎ यात शंका नाही, असे त्यांनी स्पष्ट‎ केले. महापुरात अनेक गरिबांचे‎ संसार उद्ध्वस्त झाले. त्यांना‎ सरकारने अद्यापही दमडीची मदत‎ केली नाही. मात्र, ज्यांची घरे वाहून‎ गेली त्यांना एका महिन्यात ५० घरे‎ तातडीने बांधून दिली. मी कुठल्याही‎ शासकीय अधिकाऱ्यांची‎ तालुक्यासाठी कुणाकडेही शिफारस‎ करत नाही, जो अधिकारी आला,‎ तो आपला समजून विश्वासात‎ घेऊन काम करतो. शहराचा विकास‎ आणि जनतेचे प्रश्न सोडवणे यात‎ समाधान मानत असल्याचे त्यांनी‎ स्पष्ट केले.‎

नेशन फस्ट हेच वीर सावरकरांचे‎ ब्रीद

नेशन फस्ट हेच वीर सावरकरांचे‎ ब्रीद …‎ प्रकाश पाठक यांनी वीर‎ सावरकरांच्या विचारांना उजाळा‎ दिला. ते म्हणाले, सावरकर म्हणजे‎ तपस्या, त्याग, तिखापण, नेशन‎ फस्ट- नेशन लास्ट हे सावरकरांचे‎ ब्रीद होते. सावरकरांच्या मनात‎ देशाशिवाय कुठल्याही गोष्टीने स्पर्श‎ केला नाही. सिंहाच्या गर्जनेची‎ ताकद असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे‎ वीर सावरकर हाेय. त्यांचे कामकाज‎ मोठे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.‎