देशातील सर्वसामान्यांसाठी धावणार ‘वंदे साधारण ट्रेन’? भाडे किती असू शकते?

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२३ । देशात सध्या वंदे भारत ट्रेनची चर्चा असून वेगवान आणि रॉयल लूक असल्याने देशभरातील प्रवाशांची या ट्रेनला पसंती मिळत आहे. पण जास्त भाडे असल्याने सर्वसामान्यांनी याकडे पाठ फिरवल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे भारतीय रेल्वेकडून सर्वसामान्यांसाठी वंदे भारत साधरण ट्रेन चालवण्याची जोरदार तयारी सुरू आहे.

सर्वसामान्य जनतेला लक्षात घेऊन ही ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सध्या तिचे डबे बनवले जात आहेत. दरम्यान, या ट्रेनचे भाडे वंदे भारत ट्रेनपेक्षा कमी असेल. रेल्वेने सांगितले की, जास्त भाडे असल्याने अनेकांना या ट्रेनमध्ये प्रवास करता आला नाही. ही बाब लक्षात घेऊन रेल्वेने ‘वंदे साधरण’ चालवण्याचा निर्णय घेतला. या ट्रेनचे डबे चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे तयार केले जात असल्याचे समजत आहेत.ते लवकरच बनविले जातील आणि काही महिन्यांत तयार होईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वंदे भारत सामान्य ट्रेनमध्ये 24 LHB कोच बसवले जाणार आहेत. बायो व्हॅक्यूम टॉयलेट्स, पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि चार्जिंग पॉइंट्स यांसारख्या वैशिष्ट्यांची रचना केली जाईल. यासोबतच ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. याशिवाय ऑटोमॅटिक डोअर सिस्टिमची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

ट्रेनमध्ये कमी थांबे असतील
या ट्रेन्सची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांचा वेग मेल आणि एक्स्प्रेसपेक्षा जास्त असेल आणि त्यासोबतच थांबेही कमी असतील. याशिवाय स्वयंचलित दरवाजांची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली
माहिती देताना रेल्वे मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले होते की, वंदे भारत आणि सामान्य वंदे भारत ट्रेनमधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. ही ट्रेनही शताब्दी आणि जनशताब्दीसारखी असेल. शताब्दी ट्रेन सुरू झाली तेव्हा तिचं भाडं जास्त होतं, पण त्यानंतर सर्वसामान्यांसाठी रेल्वेनं जनशताब्दी ट्रेन सुरू केली, ज्याचं भाडं कमी होतं.

भाडे किती असू शकते?
रेल्वेने ही ट्रेन गरीब लोकांसाठी बनवली आहे, जेणेकरून गरीब प्रवाशांनाही वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करता येईल. यासोबतच या लोकांना ट्रेनमध्ये सर्व सुविधा मिळू शकतात. या ट्रेनचे भाडे वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा खूपच कमी असेल. सध्या भाड्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. साधी वंदे भारत ट्रेन खास करून सर्वसामान्यांसाठी बनवली जात आहे.