जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । यावल येथील ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी विद्यार्थ्यांसाठीचे कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. त्यात शहरातील विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला. विद्यार्थ्यांसाठी कोव्हॅक्सीनचे डोस उपलब्ध झाल्याने सकाळपासून लसीकरण सुरू होते. टप्प्याटप्प्याने या ठिकाणी विद्यार्थी येत होते.
वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका पूनम सोनवणे, अमीत तडवी या कर्मचाऱ्यांनी लसीकरणाची जबाबदारी सांभाळली. जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी लसीचे डोस घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.