⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | वाणिज्य | लक्ष द्या! तुमच्या मोबाईलमधील ‘ही’ महत्वपूर्ण सेवा 15 एप्रिलपासून बंद होणार ; काय आहे घ्या जाणून..

लक्ष द्या! तुमच्या मोबाईलमधील ‘ही’ महत्वपूर्ण सेवा 15 एप्रिलपासून बंद होणार ; काय आहे घ्या जाणून..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२४ । आजकाल प्रत्येकाकडे फोन आहेत. जर तुमच्याकडे स्मार्टफोन किंवा साधा फोन असेल तर तुमच्या मोबाईलमधील ही महत्वपूर्ण सेवा पुढील महिन्याच्या 15 एप्रिलपासून बंद होत आहे. त्यासाठी केंद्रीय दूरसंचार विभागानेच दूरसंचार कंपन्यांना आदेश दिला आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो नेमका काय आहेत ते जाणून घ्या..

दूरसंचार विभाग (DOT) ने दूरसंचार कंपन्यांना 15 एप्रिलपासून USSD-आधारित कॉल फॉरवर्डिंग सेवा बंद करण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत ही सेवा बंद करण्यात येणार आहे. पण ग्राहकांना कंपन्या कॉल फॉरवर्डिंगचा पर्याय देऊ शकतात. अर्थात याविषयीची माहिती कंपन्या लवकरच देतील.दरम्यान, मोबाईल फोनद्वारे होणारी फसवणूक आणि ऑनलाइन गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितले जात आहे.

मोबाईल ग्राहक त्यांच्या फोन स्क्रीनवर कोणता सक्रिय कोड डायल करुन युएसएसडी सेवेचा उपयोग करु शकतात. या सेवेचा वापर करुन अनेकदा IMEI Number आणि सेवा पुरवठादार कंपनीकडून घेतलेल्या रिचार्जमध्ये किती बँलेन्स आहे, हे तपासण्यासाठी या सेवेचा लाभ होतो.

खरंतर अनेक मोबाईलधारक त्यांच्या फोनवर *121# वा *#99# सारख्य युएसएसडी सेवांचा उपयोग करतात. पण दूरसंचार विभागाने यातील एक सेवा बंद करण्याचा आदेश कंपन्यांना दिला आहे. येत्या 15 दिवसानंतर ही सेवा टेलिकॉम कंपन्या बंद करतील.

फसवणूक आणि सायबर गुन्हे रोखण्याचा प्रयत्न
मोबाईल फोनचा वापर करुन फसवणूक आणि सायबर गुन्ह्याला प्रतिबंध घालण्यासाठी DoT ने हा आदेश दिल्याचे समोर येत आहे. दूरसंचार विभागाने या 28 मार्च रोजी हा आदेश दिला. एसएसएसडी (अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंट्री सर्व्हिस डेटा) यांचा वापर करुन फसवणुकीचे प्रकार वाढल्याचे समोर आल्यानंतर हे पाऊल टाकण्यात आले आहे.

ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना पर्याय देण्याची शिफारस करण्यात आली आहे. 15 एप्रिल 2024 रोजीपासू युएसएसडी आधारीत कॉल फॉरवर्डिंग सेवा बंद होतील. सध्याच्या अनेक ग्राहकांनी ही सेवा सक्रिय ठेवली आहे. त्यांना पर्यायी व्यवस्था करुन देण्यास सांगण्यात आले आहे. याविषयीचा निर्णय कंपन्या घेतील.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.