जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२५ । रशिया आणि यूक्रेन यांचे युद्ध जवळपासून दोन-अडीच वर्षे झाले सुरुच असून यातच यूक्रेनने रशियाच्या ४० लष्करी विमानांवर हल्ला केल्याने यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा युद्धाचा भडका उडाला आहे. त्याचा परिणाम थेट आंतरराष्ट्रीय जगतातील सोने बाजारावर पडला.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोन्याच्या दरात तब्बल १५०० रुपयांची तर चांदीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली. या दरवाढीमुळे सोने चांदीचे दर पुन्हा उच्चांकीच्या दिशेनं जात आहे.

काय आहे सोने चांदीचे भाव?
जळगावच्या सराफ बाजारात सोमवारी सोन्याचे ९५६०० प्रतितोळा असलेल्या दरात १५०० रुपयांची वाढ होऊन ते ९७१०० (जीएसटीसह १०००१३) रुपयांवर पोहोचले. चांदीत ५०० रुपये वाढ होऊन ९८५०० वरून ती ९९००० रुपयांवर पोहोचली. सोन्याचे दर २४ दिवसांनी एक लाखांवर पोहोचले आहे.
गेल्या आठवड्यात सोन्याचे दर किंचित वाढले होते. मात्र या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात दीड हजार रुपयाची वाढ अली. रशियन हल्ल्यांच्या तीव्रतेनंतर आता युक्रेनने प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरू केल्याने पुन्हा भू-राजकीय तणाव वाढला आहे. यामुळे आता सोने चांदीचे कुठवर जातात? याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.







