---Advertisement---
बातम्या जळगाव जिल्हा राजकारण

गिरीश महाजनांना दोन नंबरच्या पैशाची मस्ती ; उन्मेष पाटीलांची जोरदार टीका

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्युज | ८ मे २०२४ | जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारार्थ मंगळवारी उद्धव ठाकरेंची सभा पार. यावेळी ठाकरे गटाचे नेते उन्मेश पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गिरीश महाजनांना दोन नंबरच्या पैशाची मस्ती, संकटमोचक नाही, तर संकट आहे, अशी टीका केलीय.

Girish Mahjan Unmesh Patil jpg webp

गिरीश महाजन हे दिल्लीच्या गोष्टी करतात, गल्लीच्या करत नाहीत. जामनेरचे मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असले तरी त्यांनी दोन नंबरचे पैसे कमावले. त्यांना दोन नंबरच्या पैशाची यांची मस्ती आहे. दोन नंबर पैशातून या आठवड्यातून लक्ष्मी दर्शन होईल”, अशी टीका उन्मेश पाटील यांनी केली आहे.

---Advertisement---

गिरीश महाजनांना लाज वाटायला पाहिजे..
उन्मेश पाटील म्हणाले, भात उत्पादकाला बोनस देतात,पणं कापसाला नाही. गुजरात कांद्याला निर्यात परवानगी दिली जाते पणं आपल्या कांद्याला नाही. केळी कापूस आणि कांदा शेतकऱ्यावर अन्याय आहे. दारूच्या बाटलीवर महिलेचा फोटो लावण्यास सांगणाऱ्या गिरीश महाजनांना लाज वाटायला पाहिजे होती. हे निष्ठेच्या गोष्टी करत आहेत. आधुनिक इंग्रजांच्या विरोधात आसूड ओढण्याची गरज आहे. तोडी फोडीचं राजकारण हे करत आहेत. ही विजय सभा आहे. करण पवार यांना विजय करण्याचा संकल्प करा, असे आवाहनही उन्मेश पाटील यांनी म्हटले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---