⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

विद्यापीठातर्फे अमृत महाेत्सवासाठी ४५ लाख

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२२ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध स्पर्धा, कार्यक्रम, उपक्रम व कार्यशाळा आयोजनासाठी वित्तीय वर्ष २०२२-२३ अंतर्गत ७५ लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्याअंतर्गत विद्यापीठाकडून ४५ लाख रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे.


विद्यार्थी विकास विभागातर्फे विविध प्रयोग शाळा व महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त प्रस्ताव विद्यापीठाने नियुक्त केलेल्या आयोजन समिती समोर ठेवण्यात आले होते. समितीने ८३ प्रस्तावास मान्यता देऊन प्रत्येक महाविद्यालयास १५ हजार याप्रमाणे एकूण १२ लाख ४५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर केले, अशी माहिती विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा. सुनील कुलकर्णी यांनी दिली.