⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

दुर्दैवी : शेतकऱ्याचा तोल जावून विहिरीत पडल्याने मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । शेतकऱ्याचा तोल जाऊन विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडीस आली आहे. संजय रामदास पाटील (वय ५०) रा. किनगाव ता. यावल ) असे मृत् शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी हंबोर्डा फोडला, याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील किनगाव येथे संजय रामदास पाटील (वय ५०) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. दि. १६ रोजी पाटील हे त्यांच्या रूईखेडा शिवारातील शेतात काम करत असताना सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास विहरी जवळ आले. विहिरीत डोकावून पाहिले असता. त्यांच्या तोल गेल्याने विहिरीत पडले, व पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी हंबोर्डा फोडला.

तरुणांच्या मदतीने मृतदेह काढला बाहेर
तरूणांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. यावल ग्रामीण रूग्णालयात शविच्छेदन करण्यात आले. ललित विठ्ठल पाटील (वय ५२) रा. दहीगाव ता. यावल यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ नरेंद्र बागुले करीत आहे.