⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

इसरो मॅजिकाच्या मार्गदर्शनात शालेय विद्यार्थ्यांनी शोधले अंतराळाती लघुग्रह !

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२२ । ESRO MAGICA च्या मार्गदर्शनाखाली, IASC (International Asteroid Search Collaboration) द्वारे आयोजित लघुग्रह शोध मोहिमेदरम्यान ESRO MAGICA च्या विद्यार्थ्यांनी ५ लघुग्रह शोधले, IASC ने त्या लघुग्रहांना प्राथमिक लघुग्रह दर्जा दिला आहे.


ही शोध मोहीम १८ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये प्रीत बोराड इयत्ता ५वी, रेनबो इंटरनॅशनल स्कूल पुणे, स्वराज गायधनी इयत्ता 7वी, बार्न्स स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नाशिक, करण लांबोळे इयत्ता7वी, विवेकानंद प्रतिष्ठान, दिवंगत बी.जी. शानभाग विद्यालय जळगाव व वैज्ञानिक प्रवीण वाकोडे यांना लघुग्रह शोधण्याचा मान मिळाला.

सन २०२० मध्ये esro मॅजिका च्या अध्यक्षा, नासा चा IASP कार्यक्रम पूर्ण करणाऱ्या जान्हवी दांगेटी यांनी शोधलेल्या asteroid ला provisional asteroid चा दर्जा IASC कडून देण्यात आला होता.

पुढील लघुग्रह शोध मोहिमेत सहभागी होण्यासाठी तुम्ही contact@esromagica.com संपर्क करू शकता.
ESRO MAGICA ही एक स्पेसटेक स्टार्टअप, आहे जी अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षण देत आहे, ही एकमेव संस्था आहे जी 6 महिन्यांच्या आत शालेय विद्यार्थ्यांनी बनवलेले साउंडिंग रॉकेट लॉन्च करणार आहे.