
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२२ । जळगाव महानगरपालिकामध्ये भाजपाला पुन्हा धक्का बसला आहे. कारण आज भाजपच्या २ नगरसेवकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यापूर्वी काल शुक्रवारी ४ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

जळगाव मनपात गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड खळबळ उडाली आहे. नगरसेवकांच्या इकडून-तिकडे उड्या सुरूच असून नागरिक संभ्रमात आहे. महापौर निवडीप्रसंगी भाजपचे २८ नगरसेवक गळाला लावत शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौरपदी तर भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले होते. शिवसेना सत्तेत आल्यानंतर भाजपने खेळी करीत १० बंडखोरांना आपल्याकडे आणण्याचा यशस्वी डाव खेळाला होता. १० नगरसेवक पुन्हा भाजपत गेल्यानंतर शिवसेना पुन्हा बहुमताच्या काठावर पोहचली होती.

मात्र, भाजपात गेलेले नगरसेवक पुन्हा शिवसेनेत प्रवेश करीत असल्याने शिवसेनेचे बहुमत वाढले आहे. यामुळे आगामी महासभेत आणि इतर निर्णय घेतांना शिवसेनेला सहज शक्य होणार आहे.
आज हसीनाबी शेख शरीफ (प्रभाग १०) आणि उषा संतोष पाटील (प्रभाग १०) यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
हे देखील वाचा :
- ईद-ए-मिलादपूर्वी अमळनेरात पोलिसांचा ‘रूट मार्च’
- स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान
- गोदावरी अभियांत्रिकीच्या प्रा.डॉ. ललिता पाटील ’राष्ट्रीय नवोदय पुरस्कार २०२६’ सन्मानित
- स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
- रावेरमध्ये केबल चोरांचा धुमाकूळ! एकाच रात्री १५ ते २० शेतकऱ्यांना मोठा फटका











