---Advertisement---
जळगाव शहर

घरातील देवघरात दिवा लावला अन् बोलवावी लागली अग्निशमन बंबाची गाडी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२२ । आंबेडकर नगर जुने जळगाव येथे दोन घरांना अचानक आग लागल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडलीय. या आगीत संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले. दरम्यान, जळगाव महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंबाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यात आले आहे.

jalgaon home fire jpg webp webp

आज सोमवारी सकाळी जळगाव शहरातील जुने जळगाव भागात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात एका पार्टेशनच्या घरामध्ये अचानक आग लागली. घरात देवघरात दिवा मुळे घराला आग लागली असल्याची बाब समोर आलीय. मात्र या आगेमुळे शेजारी असलेले पार्टिशनचे घराने देखील पेट घेतला.

---Advertisement---

यामध्ये दोघी कुटुंबातील घरातील संसारोपयोगी वस्तूंसह महत्वाची कागदपत्रे आदी सामान जाळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यात आली आहे. यामध्ये दोन्ही कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान या घटनेबाबत पोलिसात कुठलेही नोंद करण्यात आलेले नाही.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकातील अग्नीशमन अधिक्षक शशिकांत बारी, गिरीश खडके, युसूफ अली, नंदू खडके, मोहन भाकरे, रवि बोरसे, रोहिदास चौधरी, पन्नालाल सोनवणे, संतोष पाटील यांच्यासह परिसरातील नागरीकांनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---