जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२४ । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत. कुठेना कुठे अपघात होतच आहे, अशातच चाळीसगाव तालुक्यात झालेल्या अपघात दोन तरुण ठार झाले. उभ्या ट्रॅक्टरला भरधाव दुचाकी धडकल्याने मांदुर्णे (ता. चाळीसगाव) येथील दोघांचा मृत्यू झाला. समाधान रावण पाटील (24) आणि कैलास धनराज पाटील (40, दोन्ही रा.मांदूर्णे, ता.चाळीसगाव) अशी मयतांची नावे असून याबाबत मेहुणबारे पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबत असे की, चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे दोघेजण दुचाकीने तमाशा पाहण्यासाठी गेले होते. गुरूवार, 25 जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास तमाशा पाहून दोघेजण घरी परतत असतांना साकुर फाटा येथे रस्त्यावर उसाने भरलेल्या उभ्या ट्रॅक्टरला दुचाकी जोरदार आदळली. त्यामुळे दुचाकीवरील कैलास पाटील आणि धनराज पाटील या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर परीसरातील ग्रामस्थांनी धाव घेवून मदत केली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मेहुणबारे पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली. मृतदेहांना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. दरम्यान, कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. समाधान पाटील याच्या पश्चात मूलगा, पत्नी, आई, वडील असून तो एकुलता एक होता. तर कैलास पाटील यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.