⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

वृक्षतोडीचा सपाटा : शेतकरी तक्रारी करून थकले, अद्याप ठोस कारवाई नाही!

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२२ । यावल तालुक्यातील शेती शिवारात व इतर ठिकाणी जिवंत वृक्षांची भरदिवसा तोड सुरू आहे. याबाबत अनेक शेतकरी तोंडी व लेखी तक्रारी करत असूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आहे.

यावल येथील योगेंद्र प्रदीप महाजन (गट क्रमांक ८४२), दिनेश श्रावण बोरसे यांनी (गट क्रमांक २०९४) शेतातील जिवंत वृक्षतोडीबाबत पोलिस ठाणे, तहसील कार्यालय व वनपरिक्षेत्र कार्यालयात यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, या तक्रारी संदर्भात अद्याप काहीही ठोस कारवाई झालेली नाही.