एरंडोलजवळ भीषण अपघात : २ जागीच ठार, पाच जखमी

फेब्रुवारी 17, 2022 10:53 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । नितीन ठक्कर । एरंडोल असलेल्या कृष्णा ऑईल मिललगत शनिवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास चारचाकीचा भीषण अपघात झाला. अपघातात चारचाकीतील दोघे जागीच ठार झाले असून पाच जखमी झाले आहेत. दरम्यान, दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारार्थ जळगावला हलविले आहे.

IMG 20220212 WA0081 jpg webp

जळगावातील प्रताप नगरात राहणारे नरेंद्र जैन (बंब) हे कुटुंबियांसह चारचाकी क्रमांक एमएच.१९.सीव्ही.७७१७ ने बोरकुंड येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास ते जळगावकडे परतत असताना एरंडोलजवळ कृष्णा ऑईल मिललगत पुढे चालणाऱ्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारल्याने ते ट्रकमध्ये घुसले. अपघातात प्रकाशचंद राजमलजी बागरेचा व कमलाबाई नेहाल जैन हे दोन्ही वृद्ध जागीच ठार झाले.

अपघातात नरेंद्र जैन, त्यांच्या पत्नी योगीता जैन, मुलगी लभोनी, मुलगा नमन व नातेवाईक विजय जैन हे जखमी झाले आहे. दरम्यान, योगीता जैन व विजय जैन यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगावला हलविण्यात आले आहे. तर जखमींवर एरंडोल येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now