जळगावात व्यापारी आक्रमक, प्रशासनाचा निषेध, शासनाला दिला अल्टीमेटम

एप्रिल 8, 2021 5:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ एप्रिल २०२१ । सद्यःस्थितीत सर्व व्यवसायात आता कुठेतरी नियमितता येत असुन पुन्हा लॉकडाऊन लागल्यास व्यापाऱ्यांचे अर्थकारण संपणार आहे. कर्जाचे हप्ते, व्यावसायिक बँक खात्याचा भरणा, कर्मचाऱ्यांचे पगार, कालबाह्य होणारे मालाचा स्टॉक अशा अनेक समस्यांनी व्यापारी, उद्योजक, कामगार घेरला गेला आहे. यातून मार्ग काढावा लागेल.

jalgaon news

शनिवार रविवार लॉकडाऊन मान्य असुन सोमवार ते शुक्रवार दहा ते सहा अशी वेळ ठरवून द्या. अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापारी उद्योजक कामगार शिष्टमंडळ यांच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना केली आहे. आज दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक संपन्न झाली. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, भाजपा महानगर अध्यक्ष दीपकदादा सूर्यवंशी, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संत हरदासराम मर्चंट असोसिएशन, संत कवरलाल मार्केट पदाधिकारी, सेंट्रल फुले मार्केट व्यापारी संघ, संत गोधडी वाला रेडिमेट कापड मार्केट संघ, शहर ऑप्टिकल दुकानदार संघटना यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच चाळीसगाव सराफा असोसिएशनचे सुनील सराफ, चाळिसगाव रेडीमेड व्यापारी संघटनेचे सुरेश तलरेजा, प्रिंटिंग प्रेस असोशीएशनचे निलेश पिंगळे, विवेक येवले, जळगाव येथील व्यापारी सर्वश्री मोहन मंदानी, संजय विसराणी, राकेश पिंजानी, विलास माळी, दिलीप मेहता, शंकर तलरेजा, नामदेव मंधानी, भूषण शिंपी विविध व्यापारी असोसिएशनचे उपस्थित होते.

व्यापाऱ्यांच्या मागण्या रस्ता असून त्यांना विशिष्ट वेळ ठरवून दिल्यास त्यावेळेस ती त्यांची व्यापारी आस्थापने सुरू ठेवतील.  शासन आणि व्यापारी  समन्वयाची गरज असून आम्ही लोकप्रतिनिधी देखील आपल्या सोबत असून मार्ग काढावा लागेल.अशी विनंती भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना केली. व्यापारी बांधवांनी आपल्या संतप्त भावना यावेळी मांडल्यात. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी समन्वयातून मार्ग काढू अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली. मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी व्यापाऱ्यांना सहकार्य केले जाईल असे सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now