जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल शहरात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसुल विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ३ लाख २६ हजार किंमतीचे वाहनासह धुळ जप्त केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महसुल विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, यावल शहरालगतच्या व्यास मंदिरा जवळील हिंन्दु शमश्यान भुमिच्या मागील बाजूस मार्गावरील स्वराज कंपनीच्या निळ्या रंगाचे ७४४ ट्रँक्टर माँडलचा विना क्र.धुळ असलेल्या वाहनातून वाहतूक करताना आढळून आले. महसुल विभागाच्या पथकाने ट्रॅक्टर वाहन थांबवून तपासणी केली असता त्यात अर्धा ब्रास वाळू आढळून आली. ट्रॅक्टर चालक संजय भगवान भोई ( रा.बोरावल गेट यावल ) याच्याकडे विचारणा केली असता वाळू विना परवाना आढळून आल्यामुळे ३ लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर, २५ हजार रुपये किमतीचे धुळ व १ हजार ५०० रुपये किमतीचे अर्धा ब्रास वाळू असे ३ लाख २६ हजार किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

महसुल विभाग फैजपुरचे मंडळ अधिकारी एम.एच.तडवी, परसाडे तलाठी समीर तडवी, यावल तलाठी ईश्वर कोळी, अंजाळे तलाठी, टाकरखेडा तलाठी शरद सुर्यवंशी, उमेश बांभुळकर डोंगर कठोरा तलाठी, वसीम तडवी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांवर पोलिसांची मोठी कारवाई; ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त, २१ जणांवर गुन्हे दाखल
- कर्जबाजारीपणा अन् नैराश्यातून अमळनेरातील तरुण शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- अट्टल मोटारसायकल चोर पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात ; चार दुचाकी हस्तगत
- चोपड्यात अमली पदार्थांवर पोलिसांचा दणका; ७ किलो गांजासह तीन तस्करांना अटक!
- जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू









