ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने सायकलस्वार ठार

ऑगस्ट 17, 2021 12:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । शहरातील कासमवाडी परिसरात राहणारे एक वृद्ध सायकलने नेरी नाकाकडून घरी जात असताना जवळच ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली.

accident

शहरातील कासमवाडी परिसरात राहणारे सुरेश देविदास सोमवंशी वय-६० हे शिलाई मशीन रिपेअरचे काम करतात. मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास ते सायकलने जात असताना नेरी नाका ते कासमवाडी रस्त्यावर मनपाच्या कचरा संकलन करणारे ट्रॅक्टर क्रमांक एमएच.१९.एपी.७३३० च्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, चिंचेच्या झाडाजवळ असलेल्या डबक्यात सायकलचे चाक सरकल्याने ते ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याचे समजते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भावाची पत्नी आणि २ मुली असा परिवार आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now