लाच प्रकरणात मोठी कारवाई ; जिल्हा पोलीस दलातील तीन पोलीस बडतर्फ

ऑक्टोबर 31, 2021 3:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्हा पोलीस दलातील तीन पोलीस विविध लाच प्रकरणात अडकल्यानंतर त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बडतर्फ केल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी या कारवाईला दुजोरा दिला.

police

या कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कारवाई
बडतर्फ कर्मचार्‍यांमध्ये एलसीबीचे सहाय्यक फौजदार मिलिंद केदार, अनिल भगवान महाजन (फैजपूर) व भास्कर नामदेव चव्हाण (मारवड) यांचा समावेश आहे. मिलिंद केदार यांनी पती-पत्नीच्या वादात पतीला मदत करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात 20 हजार रुपयांची लाच स्वीकारली होहती तर अनिल महाजन यांनी दारूच्या अवैध धंदे चालकाकडून सप्टेंबर महिन्यात 500 रुपयांची लाच घेतली तसेच भास्कर चव्हाण यांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात दोषारोपपत्र लवकर पाठविण्यासाठी अमळनेरच्या सरकारी निवासस्थानीच 15 हजारांची लाच घेतल्याने तीनही पोलीस कर्मचार्‍यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बडतर्फ केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now