जळगावात उद्यापासून तीन दिवस ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

एप्रिल 23, 2026 3:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । परिक्षा संपल्यानंतर लागणाऱ्या सुट्टीत बालकांच्या मनोरंजनासोबतच त्यांच्यावर उत्तम संस्कार व्हावेत आणि त्यांना जागतिक दर्जाचे सिनेमे पाहता यावेत तसेच पाल्यांसोबत पालकांना देखिल आपले बालपण अनुभवता यावे या उद्देशाने जळगावात दि. २४, २५ आणि २६ एप्रिल असा तीन दिवसीय ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन शहरातील भाऊंचे उद्यान येथील एम्फी थिएटर येथे करण्यात आले आहे.

New Project 10

अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव संपन्न होणार आहे. या महोत्सवास प्रवेश विनामूल्य आहे.

दि. २४, २५ आणि २६ एप्रिल दररोज सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या या गंमत जंमत बालचित्रपट महोत्सवात आजच्या डिजिटल युगात मुले मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये व्यग्र असणाऱ्या बालकांना मोठ्या पडद्यावर दर्जेदार, प्रबोधनात्मक आणि आशयघन असणारे मनोरंजनात्मक चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन दि. २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता महापौर दीपमाला काळे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

चित्रपट हे शिक्षणाचे आणि प्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम आहे. मनोरंजनातून व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी हा एक सुवर्णयोग आहे, त्यामुळे जळगावमधील जास्तीत जास्त बालक – पालकांनी या चित्रपट महोत्सवाचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now