---Advertisement---
गुन्हे यावल

मक्याच्या गोण्या चोरणारे तिघे अटकेत

---Advertisement---

Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२२ । यावल तालुक्यातील ईदगाव येथील मुस्लिम कमिटीच्या ईदगाह मधून मक्याच्या भरलेल्या गोण्या चोरून नेणाऱ्या तीघा आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. या प्रकणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

crime 26 jpg webp

तालुक्यातील ईदगाव येथील मुस्लिम कमिटीच्या ईदगाह जवळून दि. १३ नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर दरम्यान रात्री १ वाजेच्या सुमारास 15 हजार रुपये किमतीच्या मक्याने भरलेल्या एकूण 15 गोण्या (प्रत्येकी कट्ट्यात 58 किलो मका) आरोपी नाना शिवदास साळुंखे, अजय नाना साळुंखे, विजय नाना साळुंखे यांनी चोरून नेले.

---Advertisement---

दरम्यान स्वतःचे फायदे साठी व फिर्यादीचे संमती वाचून लबाडीच्या इराद्याने चोरून नेत असताना फिर्यादी फारूक बिस्मिल्ला पिंजारी यांचे सुरक्षारक्षक इमाम युनुस पिंजारी यांनी बघितले असल्याने वरील तिघा आरोपींविरुद्ध फारूक पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ए.एस.आय नितीन चव्हाण करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---