जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । शहरातील निमखेडी शिवारातील रामदास पार्क येथून चोरटयांनी घरासमोर उभी दुचाकी व शेजारच्या एका घरातून इन्व्हर्टरसह बॅटरी लांबवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, निमखेडी शिवारातील रामदास पार्क येथे शरद भगवान पाटील ( वय ४६) वास्तव्यास आहेत. शरद पाटील यांनी घरासमोर (एमएच १९ डी ०१२२ ) या क्रमांकाची दुचाकी उभी केली होती. २३ जानेवारी रोजी सकाळी ९:०० वाजता घरासमोर उभी केलेली दुचाकी आढळून आली नाही. सर्वत्र शोध घेतला असता मिळून आले नाही. दरम्यान शरद पाटील यांच्या शेजारी राहणारे मिलिंद गंगाधरराव पवार यांच्या घरातील जिन्यात ठेवलेले इन्व्हर्टर सह बॅटरी असा दहा हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवुन दिल्याचे समोर आले. या प्रकरणी शरद पाटील यांनी बुधवारी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हरिलाल पाटील हे करीत आहे.

हे देखील वाचा :
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त







