चोरट्यांचा मोर्चा जिनिंगकडे, साडेआठ लाखांच्या कापसासह मका लांबवला

ऑक्टोबर 31, 2022 6:48 AM

Dharangaon News । जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२२ । धरणगाव शहरातील चोपडा रोडवर पवन महाले यांच्या कमल जिनिंगमधून चोरट्यांनी शनिवारी रात्री जिनिंगची बाजूची भिंत फोडत चोरट्यांनी भिंतीच्या बोगद्यातून साधारण 35 ते 40 क्विंटल कपाशी आणि तेवढाच मका मिळून लांबवल्याने जिनिंग मालकाला साडेआठ लाखांचा फटका बसला आहे.

anyatchor

शहरातील चोपडा रोडवर पवन महाले यांची कमल जिनिंग असून चोरट्यांनी शनिवार रात्री जिनिंगची बाजूची भिंत फोडत आत प्रवेश केला. त्यानंतर फोडलेल्या भिंतीच्या बोगद्यातून साधारण 35 ते 40 क्विंटल कपाशी आणि तेवढाच मका चोरून नेला.

साडेबारा लाखांच्या कपाशीसह मका लांबवला
कपाशीला आठ हजार रुपये भाव असल्यामुळे तिची किंमत साधारण चार लाखांच्या घरात आहे तर मका 50 हजार रुपये असा साधारण साडेचार लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. घटनास्थळी चार चाकी वाहनाच्या चाकांचे मार्क दिसल्याने चोरट्यांनी वाहनातून माल लांबवल्याचे स्पष्ट झाले आहे. आज सकाळी नेहमी प्रमाणे मजूर कामावर आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक अमोल गुंजाळ आपल्या पथकासह घटनास्थळी हजर झालेत.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now