नागरिकांनो लक्ष द्या ! 1 नोव्हेंबरपासून बदलले हे मोठे नियम, तुमच्या जीवनशैलीवर काय परिणाम होईल?

जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२२ । आज नोव्हेंबर महिना सुरू झाली आहे. यासोबतच अनेक मोठे बदलही झाले आहेत. या बदलांचा परिणाम तुमच्या खिशावर तर होईलच पण तुमच्या जीवनशैलीवरही परिणाम होईल. चला तर जाणून घेऊयात कोण कोणते बदल झाले आहेत.

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी आज 1 नोव्हेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 115.50 रुपयांची कपात केली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. 6 जुलैपासून घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आजच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर किमतीत झालेल्या घट नंतर दिल्लीत 19 किलोचा सिलिंडर 1859.5 रुपयांऐवजी 1744 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत कमर्शियल सिलिंडर १६९६ रुपयांना मिळणार आहे. पूर्वी येथे किंमत 1844 रुपये होती.

आरोग्य आणि सामान्य विमा दाव्यांसाठी केवायसी अनिवार्य केले आहे
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने 1 नोव्हेंबरपासून विमा घेणाऱ्या ग्राहकांना KYC (तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या) माहिती देणे बंधनकारक केले आहे. आतापर्यंत नॉन-लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेताना केवायसी देणे आवश्यक होते पण ते अनिवार्य नव्हते. आता १ नोव्हेंबरपासून ते अनिवार्य झाले आहे. हे नवीन आणि जुन्या ग्राहकांसाठी अनिवार्य आहेत. क्लेम करताना केवायसी अपडेट न केल्यास, नंतर क्लेम घेताना अडचणी येऊ शकतात.

आता गॅस सिलिंडर बुकिंगसाठी ओटीपी द्यावा लागणार
१ नोव्हेंबरपासून एलपीजी सिलिंडरच्या वितरणाशी संबंधित प्रक्रियेत बदल झाला आहे. गॅससाठी बुकिंग केल्यानंतर ग्राहकांच्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. जेव्हा सिलिंडर तुमच्या घरी पोहोचेल, तेव्हा तुम्हाला हा ओटीपी डिलिव्हरी करणार्‍याला सांगावा लागेल. कोड मिळाल्यानंतरच ग्राहकांना सिलिंडर मिळेल.

याशिवाय तेल कंपन्यांनी एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) च्या किमतीत वाढ केली आहे. सरकारी कंपन्यांच्या या निर्णयामुळे आगामी काळात हवाई तिकिटांच्या किमती वाढू शकतात. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने मंगळवारी सकाळी जारी केलेल्या किमतीत 4842.37 रुपयांनी वाढ झाली आणि दिल्लीत किंमत 120,362.64 रुपये प्रति किलोलीटर झाली.

नोव्हेंबरपासूनच, 5 कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या करदात्यांना GST रिटर्नमध्ये 5-अंकी HSN कोड प्रविष्ट करणे आवश्यक असेल. आतापर्यंत 2 अंकी HSN कोड टाकला होता. यापूर्वी 1 एप्रिल 2022 पासून 5 कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या करदात्यांना चार अंकी कोड अनिवार्य करण्यात आला होता. यानंतर 1 ऑगस्ट 2022 पासून सहा अंकी कोड टाकणे अनिवार्य करण्यात आले.

रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलले
भारतीय रेल्वेने १ नोव्हेंबरपासून सर्व गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. वेळापत्रकानुसार गाड्यांच्या वेळेत बदल होणार आहे. अशा परिस्थितीत घरातून बाहेर पडण्यापूर्वी संपूर्ण यादी तपासणे महत्त्वाचे आहे.