जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२३ । गाड्यांबाबत अनेक निर्णय रेल्वेकडून घेतले जातात. अशातच रेल्वेने आता पुन्हा अनेक गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. दिल्लीहून केरळला जाणाऱ्या अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आल्याचे रेल्वेने सांगितले. या बदलांमध्ये भुसावळ मार्गे धावणाऱ्या रेल्वेचा गाडीचा समावेश आहे. ट्रेनच्या वेळापत्रकातील हा बदल 10 जून 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत लागू असेल.
ट्रेन क्रमांक १२६१७ – एर्नाकुलम जंक्शन – हजरत निजामुद्दीन दैनिक मंगला लक्षद्वीप एक्सप्रेसची वेळ बदलण्यात आली आहे. आता ही ट्रेन वेळेच्या 3.15 तास आधी सुटेल. ही ट्रेन आता एर्नाकुलम जंक्शन येथून 10.10 वाजता सुटेल.
ट्रेन क्रमांक १२६१८ – हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम जंक्शन मंगला लक्षद्वीप डेली एक्सप्रेस एर्नाकुलम जंक्शनवर १०.२५ वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक १२४३१ तिरुअनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन ट्राय-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेस नियोजित वेळेने ४ तास ३५ मिनिटे उशिरा धावेल. ही गाडी मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी सुटणार आहे. ही ट्रेन तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून 14.40 वाजता सुटेल.
ट्रेन क्रमांक 12432 – हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल राजधानी एक्सप्रेस – 2 तास 15 मिनिटे उशीर होईल. ही ट्रेन रविवार, मंगळवार आणि बुधवारी 01.50 वाजता तिरुअनंतपुरम सेंट्रलला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 22149 – एर्नाकुलम जंक्शन – पुणे जंक्शन द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. आता ही ट्रेन 3 तास आधी सुटेल. एर्नाकुलम जंक्शन येथून रविवार व शुक्रवारी सुटेल.
ट्रेन क्रमांक – 22655 एर्नाकुलम जंक्शन – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट ट्रेन देखील 3 तास आधी सुटेल.
ट्रेन क्रमांक – १२२१७ कोचुवेली-चंदीगड द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस देखील ४ तास २० मिनिटे आधी सुटेल. सोमवार व शनिवारी कोचुवेली येथून निघेल.
ट्रेन क्रमांक – 12483 कोचुवेली-अमृतसर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस देखील 4 तास 20 मिनिटे आधी सुटेल.
ट्रेन क्रमांक – 20923 तिरुनेलवेली जंक्शन – गांधीधाम जंक्शन साप्ताहिक हमसफर सुपरफास्ट 2 तास 45 मिनिटांपूर्वी सुटेल.