हरयाणातील डॉक्टरची १७ लाखात फसवणूक ; भुसावळच्या तरुणाला ठोकल्या बेड्या

मे 24, 2025 3:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भारतात मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना वाढल्या असून त्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यातच हरयाणातील डॉक्टरची १७ लाख रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी भुसावळात तरुणाला फरिदाबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. निखिल सुनीलकुमार मनवानी (२५, रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) असं अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

arrested

फरिदाबाद (हरयाणा) येथील डॉ. श्रीमंत गुईन हे सोशल मीडियावर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी शोध घेत होते. त्यात त्यांचा भुसावळ येथील एका विक्रेत्याशी संपर्क साधला. मनीष शर्मा नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधला. डॉ. गुर्द्धन यांना वस्तू देण्याच्या नावाखाली चार वेगवेगळ्या बैंक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले.

या खात्यांमध्ये त्यांनी १७ लाख १० हजार १८० रुपये जमा केले. मात्र, त्यानंतर कोणतीही वस्तू न देता टाळाटाळ करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच १० डिसेंबर २०२४ रोजी फरिदाबाद सायबर क्राईम सेंट्रल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर फरिदाबाद पोलिसांचे पथक भुसावळात धडकले. त्यांनी भुसावळ पोलिसांच्या मदतीने संशयित निखिल मनवानी याला अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी फरिदाबाद येथे नेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक निरीक्षक उधम सिंग करत आहेत. निखिल याच्याविरुद्ध झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांमधून देखील फसवणुकीच्या तक्रारी असल्याची माहिती मिळाली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment