रेल्वेमंत्र्यांची गुडन्यूज ; भुसावळातील प्रवाशांनाही होणार फायदा, नवीन ट्रेन धावणार..

जून 2, 2025 12:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२५ । भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असलयाने अनेकवेळा रेल्वे गाड्यांमध्ये पाय ठेवायला जागा नसते.दरम्यान, मध्य प्रदेशातील एका खासदाराने रिवा-पुणे रेल्वेगाडी सुरु करण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले. त्याला दाद देत रेल्वेमंत्री वैष्णव यांनी संबंधित खासदाराला पत्र लिहून गुड न्यूज दिली. रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या या ‘गुड न्यूज’मुळे नागपूर विदर्भासह भुसावळातील प्रवाशांना फायदा होणार आहे.

railway 2 jpg webp

खासदाराने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना साद घातल्यानंतर रेल्वे बोर्डाने ही मागणी मान्य करीत नवीन रेल्वेगाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.रिवा-पुणे ही नवीन रेल्वेगाडी सुरू करण्याचा रेल्वे बोर्डाने निर्णय घेतल्याचे त्यात नमूद करून ही गाडी व्हाया बालाघाट जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

बालाघाट (मध्य प्रदेश)च्या खासदार भारती पारधी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी काही दिवसांपूर्वी चर्चा केली होती. बालाघाटवरून नागपूर, पुण्याला जाणाऱ्या, येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बालाघाट-पुणे रेल्वे मार्गावर एक नवीन रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी यावेळी खा. पारधी यांनी केली होती. त्याला अनुसरून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खा. पारधी यांना २८ मे रोजी एक पत्र लिहिले.

जारी केलेल्या रेल्वे बोर्डाच्या पत्र (सीसी -९३/ २०२५) नुसार, नवीन रीवा -पुणे साप्ताहिक एक्स्प्रेस गोंदिया, नागपूर, वर्धा, भुसावळ, मनमाड, कोपरगावमार्गे धावणार आहे. विशेष भुसावळहुन पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत या मार्गावर उपलब्ध असलेल्या रेल्वेगाड्यांची संख्या कमी आहे. आता या नवीन गाडीमुळे प्रवाशांची काहीशी सोय होणार आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

5 thoughts on “रेल्वेमंत्र्यांची गुडन्यूज ; भुसावळातील प्रवाशांनाही होणार फायदा, नवीन ट्रेन धावणार..”

  1. रिवा बालाघाट आमदार/खासदार पत्र देऊन गाडी चालू करतात भुसावळ, जळगांव खासदार आमदार झोपले आहेत का?भुसावळहून मुंबई /पुणे एकही गाडी चालू होत नाही का?किती वेळा भाजपा आमदार/खासदार निवडून द्यावेत.जन उपयोगी कामे करावीत.????????????

  2. भुसावळ जळगांव येथून मुंबई व पुणे जाणाऱ्या प्रवास्या चे हाल या आमदार खासदार यांना काय समजणार ह्यांना कोट्या मधून व हेलिकॉप्टर ने प्रवास करतात ह्यांना सामान्य जनते प्रमाणे जनरल बोगी मधून प्रवासा साठी पाठवलं पाहिजे

  3. भुसावळ जळगांव येथून मुंबई व पुणे जाणाऱ्या प्रवास्या चे हाल या आमदार खासदार यांना काय समजणार ह्यांना कोट्या मधून व हेलिकॉप्टर ने प्रवास करतात ह्यांना सामान्य जनते प्रमाणे जनरल बोगी मधून प्रवासा साठी पाठवलं पाहिजे ????????????

  4. पनवेल कल्याण इगतपुरी नाशिक भुसावल शेगाव वर्धा नागपुर भंडारा गोंदिया बालाघाट जबलपुर अशी एक एक्सप्रेस गाडी सापताही तरी सुरुकरावी

  5. रावेर मुक्ताईनगर भुसावल् जळगाव पुण्यासाठी रोज जवळ जवळ30 खाजगी ट्रॅव्हल्स ये जा करतात त्यांच्या मालकांकडून त्यांच्या व्यवसायिक हितासाठी डी आर एम खासदार आमदार आणी मंत्री यांना ट्रेन सुरु न करण्या साठी नक्कीच काहीतरी उपहार नजराणा मिळत असेल म्हणून उपरोक्त मंडळी कुठलाही ठोस पाठ पुरावा करत नाहीत हेच सत्य आहे का

Leave a Comment